पाक-आयर्लंड ऐतिहासिक कसोटी आजपासून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 May 2018

डब्लिन (आयर्लंड) - आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामुळे कसोटी क्रिकेटचा इतिहासात नवा अध्याय जोडला जाईल. या सामन्याने आयर्लंड कसोटी पदार्पण करणार असून, कसोटी खेळणारा तो अकरावा देश ठरणार आहे. 

पाकिस्तानविरुद्ध त्यांचा पहिलाच कसोटी सामना असला, तरी क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी आयर्लंडने पाकिस्तानला धक्का दिला आहे. विंडीजमध्ये २००७ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव करून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले होते. तोच आयर्लंड संघ त्याच पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करणार आहे. 

आयर्लंड संघाकडून या कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेले बहुतेक खेळाडू हे वयाची तिशी ओलांडलेले आहेत. आयरिश क्रिकेटच्या जडणघडणीत गुंतलेल्या प्रत्येकासाठी ही मोठी घटना असल्याचे मत आयर्लंड कर्णधार विल्यम पोर्टेरफिल्ड याने व्यक्त केले. त्याचवेळी प्रतिस्पर्धी कर्णधार सर्फराज अहमद याने ऐतिहासिक कसोटीशी जोडले गेल्याचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan and ireland test cricket match