अझरच्या शतकाने पाकचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

दुसऱ्या दिवशीही पावसाचाच अधिक वेळ खेळ

मेलबर्न - सलामीचा फलंदाज अझर अलीच्या शानदार शतकी खेळीने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व राखता आले. अर्थात, दुसऱ्या दिवशी पावसाचाच अधिक वेळ खेळ झाला. 

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही केवळ ५१ षटकांचाच खेळ होऊ शकला. यात पाकिस्तानने केवळ २ गडी गमावून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना वरचढ होण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा पाकिस्तानने ६ बाद ३१० धावा केल्या होत्या. अझर अली १३९, तर महंमद अमीर २८ धावांवर खेळत होता. 

दुसऱ्या दिवशी उपाहारानंतरचे दुसरे सत्र पावसामुळे वाया गेले. त्यानंतर तिसऱ्या सत्रात खेळ झाला; पण तोदेखील एक तास आधीच थांबवावा लागला.

दुसऱ्या दिवसाला सुरवात झाली, तेव्हा पहिल्या सत्रात अझर अली आणि असद शफिक (५०) यांनी वर्चस्व राखले. या दोघांच्या संयमी फलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे वर्चस्व राखण्याचे मनसुबे धुळीस मिळाले. नवा चेंडू घेतल्यावर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नियंत्रण मिळविले. बर्डने शफिकला बाद करून हे यश मिळविले. असद आणि अझर यांनी पाचव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर यष्टिरक्षक सर्फराज अहमदही झटपट बाद झाला; पण अमीरने अझरला सुरेख साथ दिली. अमीरचे प्रतिआक्रमण इतके जबरदस्त होते, की त्याने पहिल्या २१ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार लगावले. पाकिस्तानने तीनशेचाही टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चिंता वाढत होती. त्याच वेळी पावासाने हजेरी लावल्याने त्यांना दिलासा मिळाला. 

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव १०१.२ षटकांत ६ बाद ३१० (अझर अली खेळत आहे १३९, असद शफिक ५०, महंमद अमीर खेळत आहे २८, जॅक्‍सन बर्ड ३-९१, जोश हेझलवूड २-३३)

Web Title: pakistan austrolia test cricket match