अझरच्या द्विशतकानंतर वॉर्नरचा शतकी तडाखा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मेलबर्न  - पाकिस्तानचा सलामीवीर अझर अली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विक्रमी द्विशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानेही डेव्हिड वॉर्नरच्या शतकामुळे जोरदार प्रारंभ केला.

मेलबर्न  - पाकिस्तानचा सलामीवीर अझर अली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विक्रमी द्विशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानेही डेव्हिड वॉर्नरच्या शतकामुळे जोरदार प्रारंभ केला.

काल पाकने 6 बाद 306 धावा केल्या होत्या. अझर 139 धावांवर नाबाद होता. त्याने 205 धावांची नाबाद खेळी केली. पाकने 9 बाद 443 धावसंख्येवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 178 अशी मजल मारली. ऑस्ट्रेलिया आणखी 165 धावांनी मागे असून, त्यांच्या आठ विकेट बाकी आहेत.

वॉर्नरने 144 धावा फटकावल्या. मेलबर्नमधील हे त्याचे पहिलेच कसोटी शतक आहे. दिवसअखेर ख्वाजा 95 धावांवर नाबाद होता.

अझरने दिवस गाजविला. त्याने पाकतर्फे ऑस्ट्रेलियात पहिलेच कसोटी द्विशतक नोंदविले. यापूर्वी माजिद खान यांनी 1972 मध्ये मेलबर्नलाच 158 धावांची खेळी केली होती. अझरने सोहेल खान याच्यासह आठव्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी रचली. सोहेलने पहिले कसोटी अर्धशतक काढले.

वॉर्नरने ख्वाजासह दुसऱ्या विकेटसाठी 198 धावांची भागीदारी रचली. या खेळीदरम्यान वॉर्नरने कसोटी कारकिर्दीत पाच हजार धावांचा टप्पासुद्धा पार केला. 81 धावांवर तो सुदैवी ठरला. वहाब रियाझच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला होता; पण तो नोबॉल होता. सलग तीन नोबॉलमध्ये हे घडले. 38 अंश सेल्सिअस तापमान आणि प्रतिकूल खेळपट्टीमुळे पाकिस्तानचे गोलंदाज भेदक मारा करू शकले नाहीत. याचा फायदा उठवीत वॉर्नरने नियंत्रित; पण योजनाबद्ध फटकेबाजी केली.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान - पहिला डाव - 126.3 षटकांत 9 बाद 443 (अझर अली नाबाद 205-364 चेंडू, 20 चौकार, बाबर आझम 23, युनूस खान 21, मिस्बा उल हक 11, असद शफीक 50, महंमद आमीर 29, सोहेल खान 65, मिचेल स्टार्क 1-125, जॉश हेझलवूड 3-50, जॅक्‍सन बर्ड 3-113, नेथन लायन 1-115)
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - 58 षटकांत 2 बाद 278 (डेव्हिड वॉर्नर 144-143 चेंडू, 17 चौकार, 1 षटकार, उस्मान ख्वाजा खेळत आहे 95, स्टीव स्मिथ खेळत आहे 10, यासीर शाह 1-97, वहाब रियाझ 1-77)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan austrolia test cricket match