स्मिथचे १७वे कसोटी शतक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पावसामुळे कसोटी अनिर्णित अवस्थेकडे

मेलबर्न - पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने कारकिर्दीतील १७वे शतक झळकाविले. त्याने नाबाद १०० धावा केल्या; पण पावसाचा व्यत्यय कायम राहिल्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहणार हे जवळपास नक्की झाले आहे.

दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद ४६५ धावा केल्या. त्यांच्याकडे २२ धावांची आघाडी आहे. स्मिथने स्थानिक खेळाडू पीटर हॅंड्‌सकाँब याच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. हॅंड्‌सकाँबने ५४ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने काल २ बाद २७८ धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा काल ९५, तर स्मिथ १० धावांवर नाबाद होते. ख्वाजाचे शतक केवळ तीन धावांनी हुकले. वहाब रियाझच्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर स्वैर फटका मारण्याची चूक त्याला भोवली. मोसमात दुसऱ्यांदा तो ९७ धावांवर बाद झाला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ कसोटीत हे घडले होते.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान - पहिला डाव - ९ बाद ४४३ घोषित
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - ११३.५ षटकांत ६ बाद ४६५ (डेव्हिड वॉर्नर १४४, उस्मान ख्वाजा ९७-१६५ चेंडू, १३ चौकार, स्टीव स्मिथ खेळत आहे १००-१६८ चेंडू, ९ चौकार, पीटर हॅंड्‌सकाँब ५४-९० चेंडू, ८ चौकार, सोहेल खान २-८६, यासिर शाह २-१५०, वहाब रियाझ २-१३५)

Web Title: pakistan austrolia test cricket match