क्रिकेट: इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला आघाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

लंडन : फिरकीपटू यासीर शहाने सहा गडी बाद करत इंग्लंडला दिलेल्या धक्‍क्‍यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने पहिल्या डावात 67 धावांची आघाडी मिळविली. पाकिस्तानने पहिल्या डावात 339 धावा केल्या होत्या; तर इंग्लंडचा पहिला डाव 272 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर उपाहारापूर्वी पाकिस्तानने आपली आघाडी 100 च्याही पुढे नेली.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पाकिस्तानने इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व राखले. कालच्या 7 बाद 253 धावसंख्येवरून खेळ पुढे सुरू झाल्यानंतर इंग्लंडला केवळ 19 धावांचीच भर घालता आली. काल नाबाद असलेला ख्रिस वोक्‍स अखेरपर्यंत नाबादच राहिला. वहाब रियाझची वेगवान गोलंदाजी आणि यासीर शहाची फिरकी गोलंदाजी अशा दुहेरी आक्रमणासमोर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात 40 मिनिटांमध्येच इंग्लंडचे शेपूट गुंडाळले गेले. शहाने 29 षटकांत सहा गडी बाद केले; तर महंमद आमीर, राहत अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यानंतर उपाहारापर्यंतच्या 17 षटकांमध्ये इंग्लंडला सलामीवीर महंमद हफीजच्या रुपाने एकमेव यश मिळाले.

ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर झालेल्या गेल्या पाच कसोटींमध्ये इंग्लंडला केवळ एकच विजय मिळविता आला आहे. पाकिस्तानच्या तुलनेने दुबळ्या संघाविरुद्ध खेळताना ही पराभवाची मालिका खंडित करण्याची इंग्लंडला आशा होती. मात्र, पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेत पाकिस्तानने इंग्लंडला धक्का दिला आहे. अर्थात, यंदाच्या मोसमात या मैदानावर झालेल्या पाचही प्रथमश्रेणी सामने अनिर्णितच राहिले होते. पण पाकिस्तानची भेदक गोलंदाजी इंग्लंडला दुसऱ्या डावातही अडचणीत आणू शकेल.

Web Title: Pakistan extend lead after Yasir six-for