World Cup 2019 : भावांनो बघून धावा रे; पाकिस्तानला पडणार महागात

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

भारताने प्रथम फलंदाजी करताना धिम्या गतीने सुरवात केली. पण पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना दहाव्या षटकात दाखवला. भारताच्या सलामी जोडीला फोडण्याची नामी संधी त्यांनी दवडली. 

वर्ल्ड कप 2019 :मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असताना पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याला सुरवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना धिम्या गतीने सुरवात केली. पण पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना दहाव्या षटकात दाखवला. भारताच्या सलामी जोडीला फोडण्याची नामी संधी त्यांनी दवडली. 

सामन्याच्या दहाव्या षटकात रोहित शर्माला बाद करण्याची आयती संधी पाकिस्ताननं गमावली. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात असताना लोकेश राहुलनं खेळपट्टीच्या मधोमध आलेल्या रोहितला माघारी पाठवले. त्याचवेळी पाकिस्तानच्या खेळाडूनं नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. हाच थ्रो यष्टिरक्षकाकडे केला असता तर रोहित बाद झाला असता. यावेळी के एल राहुललाही बाद करता आले असते. पण, ही संधीसुद्धा पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांकडून सुटली.

भारत आणि पाकिस्तान हा सामना हाय-व्होल्टेज मानला जातो यामध्येच अशा मोठ्या चुका केल्यास पाकिस्तानला महागात पडू शकतात. त्यातही भारताचे सलामीवीर के एल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांना बाद करण्याची संधी सोडल्यास तर पाकिस्ताचे कठीण आहे.

भावांनो बघून धावा रे....
क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररणच महत्वाचे नसते तर दोन्ही यष्ट्यांच्या मध्ये व्यवस्थित धावणेही महत्वाचे असते. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात सर्व काही सुरुळीत सुरु झालेले असताना रोहित आणि के एल राहुल यांच्यात ताळमेळ चुकला आणि रोहित धावचीत होता होता वाचला. खरं तर रोहितसाठी राहुल नवा साथीदार आहे. शिखर धवनबरोबर त्याचे ट्यूनिंग चांगले जमलले आहे. पण, धवनऐवजी संधी मिळालेल्या राहुलबरोबर आज दहाव्या षटकात एक धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेताना ताळमेळ चुकला रोहित धावतच सुटला पण पाक क्षेत्ररक्षकाकडून रोहतच्या एँडकडे थ्रो आला नाही आणि रोहित वाचला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan missed opportunity to Runout rohit Sharma and KL Rahul