पाक पराभवाच्या छायेत

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

ख्राईस्टचर्च - न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभवाच्या छायेत आला आहे. पाकला १३३ धावांत गुंडाळल्यानंतर किवींनी २०० धावा केल्या. त्यांनी ६७ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाअखेर पाकची दुसऱ्या डावात ७ बाद १२९ अशी खराब स्थिती झाली. पाक केवळ ६२ धावांनी पुढे आहे. किवींकडून ट्रेंट बोल्टने भेदक मारा केला. त्याने प्रतिस्पर्धी कर्णधार मिस्बा उल हक (१३) याचा झेल घेतला. याशिवाय त्याने अझर अली (३१), सर्फराज अहमद (२) आणि महंमद आमीर (६) असे तीन बळी घेतले. नील वॅग्नर याने २६व्या कसोटीत विकेटचे शतक पूर्ण केले.

ख्राईस्टचर्च - न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभवाच्या छायेत आला आहे. पाकला १३३ धावांत गुंडाळल्यानंतर किवींनी २०० धावा केल्या. त्यांनी ६७ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाअखेर पाकची दुसऱ्या डावात ७ बाद १२९ अशी खराब स्थिती झाली. पाक केवळ ६२ धावांनी पुढे आहे. किवींकडून ट्रेंट बोल्टने भेदक मारा केला. त्याने प्रतिस्पर्धी कर्णधार मिस्बा उल हक (१३) याचा झेल घेतला. याशिवाय त्याने अझर अली (३१), सर्फराज अहमद (२) आणि महंमद आमीर (६) असे तीन बळी घेतले. नील वॅग्नर याने २६व्या कसोटीत विकेटचे शतक पूर्ण केले. त्याआधी ३ बाद १०४ वरून पाकच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सत्रात सात विकेट घेतल्या. त्यामुळे किवींना २०० धावांत रोखण्यात पाकला यश आले. यानंतर फलंदाजांवर जबाबदारी होती; पण त्यांना संयम राखता आला नाही. आज एकूण १४ विकेट पडल्या.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान ः १३३ व ६६ षटकांत ७ बाद १२९ (अझर अली ३१, बाबर आझम २९, युनूस खान १, मिस्बा उल हक १३, असद शफिक खेळत आहे ६, सोहेल खान खेळत आहे २२, ट्रेंट बोल्ट ३-१८, साऊदी १-४३, ग्रॅंडहॉमी १-२३, नील वॅग्नर २-२१) विरुद्ध न्यूझीलंड ः ५९.५ षटकांत २०० (जीत रावल ५५-१२१ चेंडू, ७ चौकार, रॉस टेलर ११, हेन्री निकोल्स ३०, कॉलिन डी ग्रॅंडहॉमी २९, टीम साऊदी २२, महंमद आमीर ३-४३, सोहेल खान ३-७८, राहत अली ४-६२).

Web Title: Pakistan vs New Zealand cricket series