इमाम आणि फखरने मोडला सर्वोच्च भागीदारीचा विक्रम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली होती. 

बुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली होती. 

सलामीवीर फखर झमान हा पाकिस्तानकडून द्विशतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच क्रिकेटविश्वातील सहावा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केले आहे. पाकिस्तानकडून यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम सईद अन्वर यांच्या नावावर होता. त्यांनी 1997मध्ये भारताविरुद्ध 194 धावा केल्या होत्या. 

 

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजी करण्याच निर्णय घेतला. सलामीला आलेल्या इमाम आणि फखरने झिंबाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. 304 धावांच्या भागीदारीत इमामने 113 तर फखरने 210 धावा केल्या. पाकिस्तानने 50 षटकांत फक्त एक गडी गमावत 399 धावांचा डोंगर रचला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत पाकिस्ताने तीन सामने जिंकत यापूर्वीच मालिका जिंकली आहे. 
 

Web Title: pakistan vs zimbabwe odi match