World Cup 2019 : 'भक्कम' फलंदाजी कोसळली रेऽऽ!

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

भारतीय संघाची फलंदाजी म्हणजे जगातील बेस्ट बटींग लाईन अप.. आमच्याकडे वर्ल्ड नंबर वन आणि टू आहेत, आम्हाला कसली फिकीर? भारतीय संघाच्या फलंदाजीबाबत नेहमीच अशा वल्गना केल्या जातात. मात्र, आज नेमक्या उपांत्य फेरीतच या फलंदाजीने कच खाल्ली. त्यामुळे भारतासमोर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाची फलंदाजी म्हणजे जगातील बेस्ट बटींग लाईन अप.. आमच्याकडे वर्ल्ड नंबर वन आणि टू आहेत, आम्हाला कसली फिकीर? भारतीय संघाच्या फलंदाजीबाबत नेहमीच अशा वल्गना केल्या जातात. मात्र, आज नेमक्या उपांत्य फेरीतच या फलंदाजीने कच खाल्ली. त्यामुळे भारतासमोर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

संपूर्ण विश्वकरंडकात ज्याच्या फलंदाजीवर भारतीय संघ पूर्णपणे विसंबून राहिला तो रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर केवळ एक धाव करुन बाद झाला. रोहित एक धाव करुन बाद झाला या धक्क्यातून भारतीय चाहते अजिबात सावरले नाहीत तर विराट कोहलीही बाद झाला. कोहलीसुद्धा एक धावा करुन बाद झाला. 

चार धावांवर एक बाद.. त्यानंतर पाचवर दोन.. खेळपट्टीवर लोकेश राहुल आणि रिषभ पंत. इथून पुढे आता चमत्कार होईल अन् राहुल पुन्हा शतक करुन भारताला मदत करेल. मात्र, एकाने कच खाल्ली की सगळे ढेपाळतात ही भारतीय संघाची जुनी परंपराच. त्या परंपरेनुसार राहुलही एक धाव करुन बाद झाला. दिनेश कार्तिककडे हिरो बनण्याची संधी असताना तोही 6 धावांवर बाद झाला. आता भारतीय संघाच्या अंतिम फेरी गाठण्याच्या संधी खूप कमी झाल्या आहेत. आता भारतीय संघाला या परिस्थितीतून एखादा चमत्कारच बाहेर काढू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pant-Pandya Key in 240 Chase, India Behind on DLS Par Score