'या' खेळाडूने घेतली कोहलीची जागा ; कोहलीचा क्रमांक किती?

वृत्तसंस्था
Wednesday, 11 July 2018

जानेवारी 2017 पासून इंग्लंडने एकदिवसीय सामन्यात एकहा पराभव स्वीकारला नाही. भारताला इंग्लंडच्या फलंदाजांना थोपवण्याचे अवघड काम करावे लागणार आहे, कारण त्यांच्या संघात जॉस बटलर, जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो आणि इऑन मॉर्गन असे एका पेक्षा एक फलंदाज आहेत.

नॉटिंगहॅम : भारताने तीन ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध दमदार विजय मिळवत प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्याची सकारात्मक सुरवात केली. इंग्लंड दौऱ्याला 2019 विश्वकरंडकाची पूर्वतयारी समजले जात असल्याने या दौऱ्यामुळे भारतीय खेळाडूंना इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. इंग्लंड संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये आहे. 

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने नुकताच ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय मालिकेत 5-0असा धुव्वा उडवला होता. तर भारतीय संघही आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तसेच ट्वेंटी मालिका जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. 

जानेवारी 2017 पासून इंग्लंडने एकदिवसीय सामन्यात एकहा पराभव स्वीकारला नाही. भारताला इंग्लंडच्या फलंदाजांना थोपवण्याचे अवघड काम करावे लागणार आहे, कारण त्यांच्या संघात जॉस बटलर, जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो आणि इऑन मॉर्गन असे एका पेक्षा एक फलंदाज आहेत.

भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत फलंदाजीत वेगवेगळे पर्याय तपासून पाहण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन हा जोडी सलामीला खेळणार हे नक्की आहे. लोकेश राहुलचा फॉर्म पाहता त्याला खालील क्रमांकावर पाठवणे संघासाठी उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावरच पाठवावे लागेल. असे झाले तर मात्र कर्णधार कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल. मधल्या फळीत सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पंड्या हे फलंदाज खेळतील. 

गोलंदाजीमध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदिप यादव यांची जागा निश्चित असेल. भुवनेश्वर कुमारची पाठदुखी बरी झाल्यास उमेश यादवसह नवीन चेंडूची जबाबदारी तो स्वीकारेल. तसेच कोहलीसमोर गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर आणि सिद्धार्थ कौल चा पर्याय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This player took up Kohlis place now Kohli is on this no