क्रिकेटपटूंच्या पगारवाढीचा विचार करू - विनोद राय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - भारतीय क्रिकेपटूंच्या मानधन करारातील रकमेत वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे बीसीसीआयच्या वतीने प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले.

मुंबई - भारतीय क्रिकेपटूंच्या मानधन करारातील रकमेत वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे बीसीसीआयच्या वतीने प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले.

क्रिकेटविश्‍वातील सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी करारबद्ध खेळाडूंच्या पगारात दुप्पट आणि सामना मानधनातही वाढ केली, परंतु ही वाढ पुरेशी आणि तुटपुंजी असल्याची टीका सर्व प्रमुख खेळाडूंनी केली होती. रवी शास्त्री यांनी तर ही वाढ चणे-शेंगदाण्याप्रमाणे असल्याचे विधान केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआय प्रशासन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या विषयावर बुधवारी विराट कोहलीची भेट घेतली. 2016-17 चा करार अगोदरच निश्‍चित झाला आहे, तरीही खेळाडूंच्या मागणीचा आम्ही पुढील मोसमासाठी विचार करू, असे राय यांनी म्हटले आहे. येत्या दोन महिन्यांत निश्‍चितच यावर तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

2016-17 च्या करारानुसार अ ब क श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे दोन कोटी, एक कोटी आणि 50 लाख रुपये मिळणार आहेत, परंतु ऑस्ट्रेलियासारख्या देशात अ श्रेणीतील खेळाडूंना 10 कोटी मिळत असल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे.

आम्ही मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांना नव्या करार रकमेचे प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले असल्याचे राय म्हणाले.

Web Title: Players can consider salary increase