भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारची निवृत्ती

वृत्तसंस्था
Sunday, 21 October 2018


दिल से खेला, दिल से बोलिंग डाला. अब मैं खेलूंगा तो एक की जगह जाएगी. 
- प्रवीण कुमार 

मेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ "ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला की, "मी घाईने नव्हे तर विचार करून हा निर्णय घेतला. मला खूप काही दिलेल्या या खेळाचा निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझे स्वप्न साकारण्याची संधी दिल्याबद्दल कुटुंबीय, "बीसीसीआय', उत्तर प्रदेश संघटना, राजीव शुक्‍ला सर यांचा मी आभारी आहे.' प्रवीणची 2011च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवड झाली होती, पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. यापुढे मुलांना प्रशिक्षण देण्याचा त्याचा मानस आहे.

दिल से खेला, दिल से बोलिंग डाला. अब मैं खेलूंगा तो एक की जगह जाएगी. 
- प्रवीण कुमार 

दृष्टिक्षेपात कारकीर्द 
कसोटी 6, विकेट 27, सरासरी 25.81 सर्वोत्तम 106 धावांत पाच 
वन-डे 68, विकेट 77, सरासरी 36.02, सर्वोत्तम 31 धावांत 4, धावा 292, सर्वोत्तम नाबाद 54  टी-20 10, विकेट 8, सरासरी 24.12, सर्वोत्तम 14 धावांत 2 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praveen Kumar Announces Retirement From All Forms Of Cricket