सर्वोत्तम खेळपट्टी बनवण्याचे दडपण- हंट 

सुनंदन लेले
Tuesday, 14 August 2018

प्रत्येक सामन्यात प्रमुख गोलंदाजांने पाच विकेट्‌स मिळविल्याच पाहिजेत किंवा प्रत्येक सामन्यात शतक हे झळकलेच पाहिजे अशी अपेक्षा नसते आणि ती धरणेदेखील चुकीचे आहे. खेळपट्टी मात्र सर्वोत्तमच असायला हवी, ही अपेक्षा मात्र दडपण वाढवते, अशी प्रतिक्रिया लॉर्डसची खेळपट्टी बनविणाऱ्या मायकेल हंट यांनी व्यक्त केली आहे. 
 

लंडन- प्रत्येक सामन्यात प्रमुख गोलंदाजांने पाच विकेट्‌स मिळविल्याच पाहिजेत किंवा प्रत्येक सामन्यात शतक हे झळकलेच पाहिजे अशी अपेक्षा नसते आणि ती धरणेदेखील चुकीचे आहे. खेळपट्टी मात्र सर्वोत्तमच असायला हवी, ही अपेक्षा मात्र दडपण वाढवते, अशी प्रतिक्रिया लॉर्डसची खेळपट्टी बनविणाऱ्या मायकेल हंट यांनी व्यक्त केली आहे. 

हंट गेली सलग 49 वर्षे या ऐतिहासिक मैदानाची खेळपट्टी बनवतोयं. जगातील सर्वोत्तम गाउंड्‌समन म्हणूनही त्याचा सन्मान झाला आहे. आता तो निवृत्त होतोय. भारताविरुद्धची दुसरी कसोटी झाल्यावर त्यांची भेट घेतली. हंट म्हणाले, ""जगभरातून लोक लॉर्डस बघायला येतात. मी रोज बघतोय..गेली 49 वर्षे. या मैदानापलीकडे मी फार काही पाहिलेलेच नाही. इथेच काम करतो आणि इथेच आवारात राहतो; पण मी समाधानी आहे. माझी कसलीच तक्रार नाही.'' 

खेळाडूंच्या हाराकिरीमुळे असो वा दुसऱ्या संघातील खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे एखादा संघ जिंकतो, तर दुसरा हरतो; पण या जय पराजयाचा प्रत्येकवेळी खेळपट्टीशी संबंध जोडला जातो. हंट म्हणाले, ""बरोबर आहे. मैदान आणि खेळपट्टी दोन्ही प्रत्येक वेळेस 100 टक्के सर्वोत्तमच असायला हवे. प्रत्येक सामन्यात गोलंदाजांने पाच विकेट्‌स मिळवाव्यात किंवा फलंदाजांने शतक करावे, अशी अपेक्षा नसते; पण खेळपट्टी आणि मैदान सर्वोत्तम असायलाच लागते. त्यामुळे काम करताना खेळपट्टी सर्वोत्तम राहील का? याचे दडपण कायम असते.'' 

भारतीयांकडून निराशा 
या वेळी कसोटी चार दिवसांत संपल्याबद्दल हंट काहीसा निराश होता. भारतीय संघ मला आवडतो. त्यांचे काही विजय मी अनुभवले आहेत. 1983 मधील विश्‍वकरंडक विजेता, 2002 मधील नॅटवेस्ट स्पर्धेतील अंतिम सामना या दोन्ही सामन्यातील विजय ही भारतीय संघाची ओळख होती; पण आज मी निराश झालो. अर्थात, भारतीय फलंदाजी सुरू झाली तेव्हा दोन्ही वेळेस वातावरण वेगवान गोलंदाजीस पोषक असेच होते. तेथे कुठल्याही संघाची अशीच परिस्थिती झाली असती; पण प्रतिकाराची अपेक्षा बाळगली होती, असे हंट यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pressure of making the best pitch says hunt