उद्याच्या कसोटीसाठी अंतिम 12 खेळाडूंचा संघ जाहीर; पृथ्वी शॉचा समावेश

वृत्तसंस्था
Wednesday, 3 October 2018

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पृथ्वी शॉला कानमंत्र दिला आहे. 

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पृथ्वी शॉला कानमंत्र दिला आहे. 

''वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत पथ्वी शॉला पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ही संधी मिळाल्यास त्याने आपल्या नैसर्गिक आक्रमकतेला आळा घालू नये. मुंबईसाठी खेळतो तसा खेळ त्याने करावा. 'अ' संघाकडून खेळताना त्याने ते दाखवून दिले आहे,'' असे मत रहाणेने व्यक्त केले आहे. 

बीसीसीआयने सौराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर उसळती खेळपट्टी बनवण्याची मागणी केली होती. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाजांना अधिक पसंती असेल अंतिम संघात केवळ एक किंवा दोन फिरकी गोलंदाजांना स्थान दिले जाईल. तसेच पृथ्वी शॉला संघात स्थान मिळाल्याने मयांक अगरवालचे पदार्पण लांबणीवर पडले आहे तर महंमद सिराजलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. 

12 खेळाडूंचा संघ : लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, महंमद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर

पृथ्वी शॉचा प्रवास-
14 वर्षे : शालेय स्पर्धेत 546 धावा
17 वर्षे : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण
17 वर्षे : रणजी आणि दुलिप करंडकात शतक
18 वर्षे : विश्वविजेत्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार
18 वर्षे : प्रथम क्श्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतके, आयपीएलमध्ये पदार्पण
18 वर्षे, 329 दिवस : भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्यास सज्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithvi Shaw is all set for his maiden test