क्रिकेटच्या क्षितिजावर आणखी एक 'वंडरबॉय'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई - सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर अशा विक्रमादित्य फलंदाजांच्या मुंबईत आता आणखी एका "वंडरबॉय'चा उदय झाला आहे. शालेय क्रिकेटमध्ये पाचशे धावांचा विक्रम करणाऱ्या पृथ्वी शॉने रणजी पदार्पणात शतक झळकावले. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने 120 धावांची शतकी खेळी केली. त्याच्याच खेळीने मुंबईने तमिळनाडूचा पराभव करून रणजी क्रिकेटमध्ये यंदाही अंतिम फेरी गाठली.

रणजी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने 16 व्या वर्षी पदार्पणात शतक केले होते. आतापर्यंत रणजी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी हा मुंबईचा सहावा आणि देशातला 14 वा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरनंतरचा तो सर्वांत लहान शतकवीर आहे.

यंदाच्या रणजी स्पर्धेत मुंबई बहुतेक सामन्यात बॅकफूटवरून फ्रंटफूटवर आली आहे. संघर्ष त्यांच्या पाठीशीच लागला होता. अनेक खेळाडूंची अदलाबदली, दुखापती याच्या गर्तेत अडकलेला मुंबईचा संघ उपांत्य फेरीतही अडचणीत आला होता. मात्र मोक्‍याच्या वेळी त्यांचा प्रत्येक खेळाडू कामगिरी उंचावतो आणि मुंबईचा विजय साकार होतो. हाच प्रत्यय पुन्हा आला.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्यामुळे पृथ्वीच्या गुणवत्तेची चुणूक 14 व्या वर्षीच दिसून आली होती. हॅरिस शिल्ड शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने दोन वर्षांपूर्वी 330 चेंडूंत 546 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याचा हा विक्रम गेल्या वर्षी प्रणव धनावडेने एक हजार धावा करून मोडला.

Web Title: prithvi shaw in ranaji karandak