पृथ्वी शॉचे तंत्र सचिनसारखेच - मार्क वॉ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणारा मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉ याला प्रभावित केले आहे. त्यांची फलंदाजी बघितल्यावर आपल्याला त्याचे तंत्र अगदी सचिन तेंडुलकरसारखे असल्याचे जाणवले, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे.

कुठल्याही गोलंदाजीवर तितक्‍याच सहज फटके खेळण्यासाठी आवश्‍यक असलेला ‘पाया’ त्याच्या तंत्रातून दिसून येतो, असे सांगून वॉ म्हणाला, ‘‘त्याच्या बॅटची ग्रीप, त्याचा स्टान्स, खेळपट्टीवर थांबण्याची जिद्द आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला फटके मारण्याची त्याची पद्धत यातून मला सचिनचा भास होतो.’’ तो चेंडू काहीसा उशिरा खेळतो, पण त्यात कमालीची अचूकता आहे, असेही तो म्हणाला.

Web Title: prithvi shaw technic sachin tendulkar mark waugh