द्रविड आणि पुजाराचा रेकॉर्डसच्या बाबतीत किती हा योगायोग !

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या कामगिरीशीबरोबरी केली आहे. 

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या कामगिरीशीबरोबरी केली आहे. 

पुजारा आणि द्रविड दोघांनीही 67 डावांमध्ये 3000 धावांटा टप्पा पूर्ण केला आहे. तर 4000 आणि 5000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी दोघांनाही अनुक्रमे 54 आणि 108 डाव लागले आहेत. 

पुजाराने 2014 मध्ये अॅडेलडच्याच मैदानावर 73 धावांची खेळी केली होती. त्यावेळी हुकलेले शतक त्याने आज पूर्ण केले. इंग्लंड दौऱ्यात त्याच्या फलंदाजीच्या शैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले तर त्याला पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळ्यात आले होते. मात्र चौथ्या कसोटी सामन्यातही त्याने एकट्य़ाने लढत 123 धावा केल्या. आजही त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pujara shares a record with rahul dravid