पुण्यातील खेळपट्टीचा दर्जा निकृष्टच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली - यजमान संघाला पुरक अशी खेळपट्टी बनविण्यावरुन दोन वर्षात दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) खुलासा करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षापूर्वी नागपुर येथील खेळपट्टीबाबत बीसीसीआयने प्रथम खुलासा केला. आता त्यांना पुणे येथील खेळपट्टीबाबत खुलासा करण्याची वेळ आली आहे. दोन खेळपट्ट्या फिरकीस पुरक अशा होत्या. फरक इतकाच की दोन वर्षापुर्वीचा सामना भारताने जिंकला आणि आता भारत सामना हरले आहे. 

नवी दिल्ली - यजमान संघाला पुरक अशी खेळपट्टी बनविण्यावरुन दोन वर्षात दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) खुलासा करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षापूर्वी नागपुर येथील खेळपट्टीबाबत बीसीसीआयने प्रथम खुलासा केला. आता त्यांना पुणे येथील खेळपट्टीबाबत खुलासा करण्याची वेळ आली आहे. दोन खेळपट्ट्या फिरकीस पुरक अशा होत्या. फरक इतकाच की दोन वर्षापुर्वीचा सामना भारताने जिंकला आणि आता भारत सामना हरले आहे. 

आंतरराष्ट्रीय कसोटी सामना पुण्यात खेळविण्याचे स्वप्न भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने पूर्ण झाले असले, तरी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला या सामन्याचे आयोजन चांगले महागात पडले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानंतर आयसीसीने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावरील खेळपट्टीवरून बीसीसीआयला चौदा दिवसांत खुलासा करण्यास सांगितला आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या दानावरील खेळपट्टीचा दर्जा निकृष्ट असल्याचे ‘आयसीसी’ने मंगळवारी जाहीर केले.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिलाच कसोटी सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळविण्यात आला. हा सामना अडीच दिवसांत संपुष्टात आला. फिरकीसाठी अनुकूल करण्यात आलेल्या खेळपट्टीवर भारतच अडकले आणि ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज स्टिफन ओकीफ याने सामन्यात १२ गडी बाद करत भारताला निष्प्रभ केले होते.

या सामन्यासाठी असलेले निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांनी आपल्या अहवालात या खेळपट्टीच्या दर्जाबाबात आयसीसीच्या खेळपट्टी आणि आउटफिल्ड देखरेख पद्धतीच्या नियम ३ला अनुसरून ताशेरे ओढले आहेत. त्यांनी खेळपट्टीचा दर्जा निकृष्ट असल्याचा उल्लेख केला असून, अहवाल ‘आयसीसी’ला सादर केला. आयसीसीने हा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सादर केला असून, त्यांना चौदा दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना होता. 

‘बीसीसीआय’ने अहवालाच्या निकषांवर चौदा दिवसांत उत्तर दिल्यानंतर ते आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक जिऑफ ॲर्ल्डाइस आणि आयसीसी निरीक्षक रंजन मदुगले यांच्यासमोर ठेवण्यात येईल. ही समिती नियम ४-अ नुसार पुढील निर्णय घेईल.

मालिकेतील दुसरा कसोटी सामना बंगळूर येथे एम. चिन्नास्वामी मैदानावर ४ मार्चपासून खेळविण्यात येईल. 

नागपुरातही असेच घडले होते
दोन वर्षांपूर्वी नागपुरातही असेच घडले होते. तेव्हा भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना तीन दिवसांत आटोपला होता. फिरकीस पोषक खेळपट्टी बनवल्याबद्दल आरडाओरड झाली होती. त्या वेळी सामनाधिकारी जेफ क्रो यांनी खेळपट्टीबाबत निकृष्ट असाच शेरा दिला होता. यावर बीसीसीआयला १४ दिवसांत उत्तर द्यायचे होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमला याने ही खेळपट्टी त्याच्या कारकिर्दीतील सर्वांत कठीण खेळपट्टी होती, असे म्हटले होते. मात्र, अधिकृत तक्रार केली नव्हती. बीसीसीआयने यावर उत्तर दिले. भारताला फायदा होईल, अशी खेळपट्टी तयार करण्यात आली नव्हती, असा उल्लेख त्यात होता. सामन्याचे व्हिडिओ फुटेज व इतर तथ्य तपासल्यावर व्हीसीए जामठाला आयसीसीकडून फक्त ताकीद देण्यात आली. यानंतर चार महिन्यांनी याच मैदानावर टी-२० विश्‍वकरंडकातील पात्रता फेरीसह एकूण अकरा सामने खेळले गेले.

Web Title: pune pitch poor