पंजाबच्या मेंटॉरपदी सेहवाग कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नवी दिल्ली - किंग्ज इलेव्हन पंजाबने आगामी आयपीएल मोसमाच्या पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. मेंटॉर म्हणून वीरेंद्र सेहवाग याच्याबरोबरील करार वाढविण्यात आला. तो क्रिकेट उपक्रम आणि धोरणप्रमुख; तसेच ब्रॅंड अँबॅसेडरही असेल. त्याच्या उदंड अनुभव; तसेच ज्ञानाचा संघाला फायदा होईल, असा विश्वास फ्रॅंचायजीला वाटतो. सेहवागने सांगितले, की किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मार्गदर्शन करणे हा मोठा सन्मान आहे. या संघाला माझ्या हृदयात स्थान आहे. आगामी मोसमासाठी आम्ही उत्सुक आहोत.
Web Title: punjab mentor virendra sehwag