क्विंटन डिकॉकचे घणाघाती शतक; दक्षिण आफ्रिकेचा विजय

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 9 बाद 294 

डेव्हिड वॉर्नर 40, ऍरॉन फिंच 33, जॉर्ज बेली 74, मिशेल मार्श 31, जॉन हेस्टिंग्ज 51 
अँडिली फेहलूक्वायो 4-44, डेल स्टेन 2-65, वेन पार्नेल 1-56, 1-46 इम्रान ताहीर 

दक्षिण आफ्रिका : 50 षटकांत 36.2 षटकांत 4 बाद 295 
क्विंटन डिकॉक 178, रिली रॉसू 63, फाफ डू प्लेसिस 26 
स्कॉट बोलंड 3-67, ऍडम झम्पा 1-44 

सेंच्युरियन: यष्टिरक्षक क्विंटन डिकॉकचे घणाघाती शतक आणि रिली रॉसूच्या वेगवान अर्धशतकामुळे दक्षिण आफ्रिकेने काल (शुक्रवार) रात्री झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहा गडी आणि 82 चेंडू राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 294 धावा केल्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 37 व्या षटकातच पूर्ण केले. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

सेंच्युरियनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना याचा फायदा घेता आला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंचने नऊ षटकांतच 60 धावा करत वेगवान सुरवात करून दिली होती. वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला खीळ बसली. जॉर्ज बेलीच्या 74 धावा आणि जॉन हेस्टिंगच्या 51 धावांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसविता आला नाही. कारकिर्दीतील दुसराच सामना खेळणाऱ्या 20 वर्षीय अँडिली फेहलूक्वायो याने वेगवान गोलंदाजाने चार गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. 

क्विंटन डिकॉक आणि रिकी रॉसूने धडाक्‍यात सुरवात करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. या दोघांनी 17 षटकांतच 145 धावांची सलामी दिली. डिकॉकने 113 चेंडूंत 16 चौकार आणि 11 षटकारांसह 178 धावा केल्या. एबी डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या फाफ डू प्लेसिसने 26 धावा केल्या. डू प्लेसिस, जेपी ड्युमिनी, डिकॉक झटपट बाद झाले, तरीही विजय दक्षिण आफ्रिकेच्या आवाक्‍यात आला होता. डेव्हिड मिलर आणि फरहान बेहर्डिन यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 9 बाद 294 

डेव्हिड वॉर्नर 40, ऍरॉन फिंच 33, जॉर्ज बेली 74, मिशेल मार्श 31, जॉन हेस्टिंग्ज 51 
अँडिली फेहलूक्वायो 4-44, डेल स्टेन 2-65, वेन पार्नेल 1-56, 1-46 इम्रान ताहीर 

दक्षिण आफ्रिका : 50 षटकांत 36.2 षटकांत 4 बाद 295 
क्विंटन डिकॉक 178, रिली रॉसू 63, फाफ डू प्लेसिस 26 
स्कॉट बोलंड 3-67, ऍडम झम्पा 1-44 

Web Title: Quinton De Kock hits century against Australia