कसोटी क्रिकेट कारकिर्दीत अश्‍विनला विक्रमाची संधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

हैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन याला कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 विकेट्‌स पूर्ण करण्याच्या विक्रमाची संधी आजपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी सामन्यातून साधता येईल.

आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने 44 कसोटींत 248 गडी बाद केले असून, त्याला सर्वांत वेगवान अडीचशे विकेट्‌सचा टप्पा ओलांडण्याची संधी आहे. अशी कामगिरी केल्यास अश्‍विन ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांचा विक्रम मोडेल. त्यांनी 48 कसोटींत ही कामगिरी केली होती. 

अश्‍विनला हा विक्रम मोडण्यासाठी आणखी तीन कसोटी सामने असले तरी, तो बांगलादेशविरुद्धच ही कामगिरी करेल. हैदराबाद येथील मैदानावर त्याने यापूर्वी चार डावांत दोन वेळा पाचहून अधिक गडी बाद केले आहेत. मुख्य म्हणजे तो पूर्ण भरात आहे.

अलीकडेच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने पाच कसोटी सामन्यात 28 गडी बाद केले होते. अश्‍विनने कारकिर्दीत कमी कसोटीत 200 गडी बाद करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने 37 कसोटींत अशी कामगिरी करताना पाकिस्तानच्या वकार युनूसचा विक्रम मोडीत काढला होता. त्याने 38 कसोटींत ही कामगिरी केली होती. 

Web Title: R Ashwin Cricket India versus Bangladesh ICC Rankings