आश्विन, जडेजा गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

बंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला होता. या कसोटीत जडेजाने पहिल्या डावात 6 आणि आश्विनने दुसऱ्या डावात सहा बळी घेतले होते. यामुळे या दोघांच्या नामांकनात सुधारणा झाली आहे.

दुबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे फिरकीपटू आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहचले आहेत.

बंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला होता. या कसोटीत जडेजाने पहिल्या डावात 6 आणि आश्विनने दुसऱ्या डावात सहा बळी घेतले होते. यामुळे या दोघांच्या नामांकनात सुधारणा झाली आहे. जडेजाने प्रथमच गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे. दोन्ही भारतीय फिरकीपटू गोलंदाजांच्या क्रमवारीत दोघे जण अव्वल स्थान पोहचले आहे. यापूर्वी 2008 मध्ये डेल स्टेन आणि मुथय्या मुरलीधरन संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होते. 

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार, फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट आहे. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या कसोटीत केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे तो सहाव्या स्थानावर पोहचला आहे. तर अजिंक्य रहाणे पंधराव्या स्थानी आहे. 

Web Title: R Ashwin, Ravindra Jadeja Jointly Atop ICC Test Rankings