कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विन अव्वल

वृत्तसंस्था
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विनपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. त्याचे 878 गुण आहेत. त्यानंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 870 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
 

इंदूर: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. आश्‍विन आता कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर दाखल झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज (बुधवार) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार आश्‍विनने डेल स्टेन आणि जेम्स अँडरसन यांना मागे टाकले आहे.

इंदूरमधील न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विन तिसऱ्या स्थानी होता. या कसोटीत आश्‍विनने पहिल्या डावात 81 धावांत सहा गडी, तर दुसऱ्या डावात 59 धावांत सात गडी बाद केले. या कामगिरीमुळे आश्‍विनचे एकूण गुण 900 झाले. 2000 नंतर कसोटी क्रमवारीत 900 गुण करणाऱ्या मोजक्‍या गोलंदाजांमध्ये आता आश्‍विनचाही समावेश झाला आहे. याआधी मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, व्हरनॉन फिलॅंडर, डेल स्टेन आणि शॉन पोलॉक यांनी ही कामगिरी केली आहे.

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विनपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. त्याचे 878 गुण आहेत. त्यानंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 870 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

कसोटी गोलंदाजांची क्रमवारी :
1. आर. आश्‍विन (भारत)
2. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड)
4. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
5. रंगना हेराथ (श्रीलंका)
6. यासीर शहा (पाकिस्तान)
7. रवींद्र जडेजा (भारत)
8. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
9. नील वॅग्नर (न्यूझीलंड)
10. व्हरनॉन फिलॅंडर (दक्षिण आफ्रिका)

कसोटी फलंदाजांची क्रमवारी :
1. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
2. ज्यो रूट (इंग्लंड)
3. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
4. युनूस खान (पाकिस्तान)
5. केन विल्यमसन (न्यूझीलंड)
6. अजिंक्‍य रहाणे (भारत)
7. ऍडम व्होजेस (ऑस्ट्रेलिया)
8. एबी डिव्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)
9. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
10. ऍलिस्टर कूक (इंग्लंड)

Web Title: R Ashwin regains top position in Test bowling rankings