ठाकूर यांची गच्छंती तर्कसुसंगत - लोढा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नवी दिल्ली - ‘हा भारतातील क्रीडा क्षेत्राचा आणि खास करून क्रिकेटचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने माझ्या समितीच्या शिफारशी १८ जुलैच्या आदेशाद्वारे स्वीकारल्या. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणारच होती. हे घडणारच होते आणि आता घडले आहे. ठाकूर यांची गच्छंती हा याचाच तर्कसुसंगत परिणाम आहे,’ अशी प्रतिक्रिया न्या. आर. एम. लोढा यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली - ‘हा भारतातील क्रीडा क्षेत्राचा आणि खास करून क्रिकेटचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने माझ्या समितीच्या शिफारशी १८ जुलैच्या आदेशाद्वारे स्वीकारल्या. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणारच होती. हे घडणारच होते आणि आता घडले आहे. ठाकूर यांची गच्छंती हा याचाच तर्कसुसंगत परिणाम आहे,’ अशी प्रतिक्रिया न्या. आर. एम. लोढा यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे क्रिकेटमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि चांगले प्रशासन निर्माण होईल. यामुळे इतर क्रीडा संघटनांनाही चपराक बसावी, अशी माझी इच्छा आणि आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाला मी तीन अहवाल सादर केले. त्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

मागोवा...

अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के पदावरून दूर झाल्यावर अखेर बीसीसीआय आणि लोढा समिती यांच्यात सुरू असलेली न्यायालयीन लढाई अखेर सोमवारी संपुष्टात आली. मात्र, यानंतरही बीसीसीआयमध्ये अनेक बदलांची शक्‍यता दिसून येत आहे. येणाऱ्या काळात हे बदल दिसून येतील; पण आजपर्यंत घडलेल्या प्रमुख घटनांचा हा धावता आढावा...

१८ जुलै २०१६ - लोढा समितीने बीसीसीआयच्या कामकाजात केलेल्या बदलांच्या शिफारशीचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्वागत. बीसीसीआयला हे बदल स्वीकारण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी.

९ ऑगस्ट - माजी न्यायाधीश आर. एम. लोढा यांनी चर्चेसाठी आमंत्रण देऊनही ठाकूर अनुपस्थित. काही दिवसांनी शिर्के यांच्याशी भेट झाल्यानंतर लोढा समितीने त्यांच्या तरतुदींचा पहिला आराखडा सादर केला. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर.

१ सप्टेंबर  - लोढा समितीकडून बीसीसीआयला मार्गदर्शक तत्त्वांचा दुसरा अहवाल. त्यानुसार बीसीसीआयला डिसेंबर १५ पूर्वी निवडणुका व सर्वसाधारण सभा घेणे अनिवार्य. तसेच, बोर्डाला डिसेंबर ३० पूर्वी नवीन आयपीएल समिती तयार करण्याचे आदेश.

२८ सप्टेंबर - लोढा समितीतर्फे सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयविरुद्ध त्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल तक्रार. न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांचा बीसीसीआयला लोढा समितीच्या तरतुदी मान्य करण्याचा आदेश.

३० सप्टेंबर - लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्याची बीसीसीआयची पहिली मुदत संपुष्टात. समितीतर्फे येस बॅंक व बॅंक ऑफ महाराष्ट्र यांना राज्य संघटनांना देण्यात येणारा निधी स्थगित करण्याची सूचना, त्यामुळे भारत विरुद्‌ध न्यूझीलंड मालिका रद्द होण्याची चिन्हे; परंतु राज्य संघटनेला निधी पुरवण्यात आला व मालिका सुरळीत पार पडली.

बीसीसीआयने जर लोढा समितीच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर राज्य संघटनांना देण्यात येणारा निधी रोखण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा.
 नोव्हेंबरमध्ये लोढा समितीतर्फे बीसीसीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवून जी. के. पिल्लाई यांना बीसीसीआयच्या रोजच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले.

डिसेंबरमध्ये अध्यक्ष ठाकूर यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयातर्फे दावा. 

२ जानेवारी २०१७ - बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना पदच्युत करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश.

Web Title: r. m. lodha talking