esakal | रबाडा, शम्सीच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

Rabada Tabraiz Shamsi Set Up South Africas Big Win In First One Day

वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि फिरकी गोलंदाज ताबरेझ शम्सी यांच्या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा विजय सुकर झाला. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धचा हा सामना 5 गडी राखून जिंकला. 

रबाडा, शम्सीच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचा विजय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

डंम्बुला - वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि फिरकी गोलंदाज ताबरेझ शम्सी यांच्या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा विजय सुकर झाला. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धचा हा सामना 5 गडी राखून जिंकला. 

रबाडा आणि शम्सी यांच्या गोलंदाजीपुढे प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव 35 षटकांत 193 धावांतच आटोपला. रबाडाने 41, तर शम्सीने 33 धावांत प्रत्येकी 4 गडी बाद केले. 

आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिले दोन फलंदाज झटपट गमवावे लागले. श्रीलंकेचा ऑफ स्पिन गोलंदाज अकिला धनंजय याने हे दोन गडी बाद केले. त्यानंतर क्वींटॉन डी कॉक आणि कर्णधार डू प्लेसिस यांनी प्रत्येकी 47 धावा करून डाव सावरला. या जोडीने 86 धावांची भागीदारी केली. डी कॉकला धनंजयनेच बाद केले. पण, नंतर जेपी ड्युमिनीने 32 चेंडूंत नाबाद 53 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेचा विजय सुकर केला. दक्षिण आफ्रिकेने 31 षटकांत 5 बाद 196 धावा केल्या. 

त्यापूर्वी कुशल परेरा (81) आणि थिसरा परेरा (49) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 92 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला किमान दोनशेच्या जवळपास जाता आले. 

संक्षिप्त धावफलक ः 
श्रीलंका 34.3 षटकांत 193 (कुशल परेरा 81, थिसरा परेरा 49, कागिसो रबाडा 4-41, ताबरेझ शम्सी 4-33) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका 31 षटकांत 5 बाद 196 (डी कॉक 47, डू प्लेसिस 47, ड्युमिनी नाबाद 53, अकिला धनंजय 3-50). 

 

loading image