रहाणेचे मुंबईतच दणक्‍यात पुनरागमन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईतच वानखेडे स्टेडियमवर सराव करताना दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाबाहेर जावे लागलेल्या अजिंक्‍य रहाणेने मुंबईतच ब्रेबॉर्न स्टेडियमवर दणकेबाज 91 धावांची खेळी करीत पुनरागमनाची वर्दी दिली. याच स्टेडियमवर धोनीला इंग्लंडविरुद्धचा सराव सामना जिंकता आला नव्हता; पण रहाणेने विजयश्री मिळवली. 

मुंबई - मुंबईतच वानखेडे स्टेडियमवर सराव करताना दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाबाहेर जावे लागलेल्या अजिंक्‍य रहाणेने मुंबईतच ब्रेबॉर्न स्टेडियमवर दणकेबाज 91 धावांची खेळी करीत पुनरागमनाची वर्दी दिली. याच स्टेडियमवर धोनीला इंग्लंडविरुद्धचा सराव सामना जिंकता आला नव्हता; पण रहाणेने विजयश्री मिळवली. 

दोन दिवसांपूर्वी धोनीच्या भारत अ संघास हरवणाऱ्या इंग्लंडला रहाणेच्या नवोदित भारत अ संघाने पराभवाची धूळ चारली. सराव सामन्यात निखालास महत्त्व नसल्याचे सांगितले जाते. तरी भारत अ संघाची कामगिरी विराट कोहलीच्या मुख्य भारतीय संघाला स्फूर्ती देणारी ठरेल. दोन दिवसांपूर्वी भारत अ संघाची 304 ही धावसंख्या इंग्लंडने आरामात पार केली होती. आज त्याच इंग्लंडला 283 धावांत गुंडाळण्याचा पराक्रम भारत अच्या नवोदितांनी केला. त्यानंतर हे आव्हान सहा विकेट राखून आणि 62 चेंडू शिल्लक ठेवून पार केले. 

रहाणेची एकदिवसीय संघात निवड झाली आहे; तर ट्‌वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले आहे. वानखेडेवरील कसोटीसाठी सराव करताना दुखापत झाल्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन सामन्यांत खेळता आले नव्हते. आता तंदुरुस्तीबरोबर त्याला उपयुक्तताही सिद्ध करायची होती आणि त्याने ती पहिल्याच परीक्षेत दाखवून दिली. सलामीला खेळणाऱ्या रहाणेचा 109 स्ट्राइक रेट पुण्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघातले स्थान निश्‍चित करणारा ठरू शकेल. धोनीचा वारसदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रिषभ पंतकडेही लक्ष होते. त्यानेही आक्रमक अर्धशतक केले. 

त्याअगोदर ऍलेक्‍स हेल्स व बेअरस्टॉ यांनी सकाळी चांगलीच टोलेबाजी केली. त्यामुळे इंग्लंड आजही 300 चा पल्ला पार करणार, असे वाटत होते; परंतु शाहबाज नदीम व परवेझ रसुल या फिरकी गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना चकवले. त्यांची 9 बाद 211 अशी अवस्था झाली होती; परंतु विली व रशिद यांनी अखेरच्या जोडीसाठी अर्धशतकी भागीदारी केली नसती, तर हा सामना जास्तीत 40-40 षटकांचाच झाला असता. 

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड - 48.5 षटकांत 282 (जॅसन रॉय 25- 15 चेंडूंत 6 चौकार, ऍलेक्‍स हेल्स 51- 53 चेंडूंत 8 चौकार, जॉनी बेअरस्टॉ 64- 65 चेंडूंत 10 चौकार, बेन स्टोक्‍स 38- 56 चेंडूंत 6 चौकार, आदिल रशिद 39, डेव्हिड विली 38; संगवान 6.5-0-64-2, अशोक दिंडा 8-1-55-2, नदीम 10-0-41-2, रसूल 10-1-38-3) पराभूत वि. भारत अ - 39.4 षटकांत 4 बाद 283 (अजिंक्‍य रहाणे 91- 83 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार, शेल्डन जॅकसन 59- 56 चेंडूंत 7 चौकार, रिषभ पंत 59- 36 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार, सुरेश रैना 45- 34 चेंडूंत 7 चौकार; विली 5-0-32-1). 

Web Title: Rahane comeback strong start in Mumbai