राहुल द्रविड, रिकी पॉटिंगचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

वृत्तसंस्था
Tuesday, 3 July 2018

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अनुक्रमे राहुल द्रविड आणि रिकी पॉंटिंग यांचा आयसीसीच्या ङॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन पुरुष क्रिकेटपटूंसह इंग्लंडची माजी क्रिकेटपटू यष्टिरक्षक क्‍लेरी टेलर हिचाही समावेश करण्यात आला आहे. डब्लिन येथे हा सोहळा पार पडला. 

दुबई -  भारत आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अनुक्रमे राहुल द्रविड आणि रिकी पॉंटिंग यांचा आयसीसीच्या ङॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन पुरुष क्रिकेटपटूंसह इंग्लंडची माजी क्रिकेटपटू यष्टिरक्षक क्‍लेरी टेलर हिचाही समावेश करण्यात आला आहे. डब्लिन येथे हा सोहळा पार पडला. 

"आयसीसी'च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा द्रविड भारताचा केवळ पाचवा खेळाडू ठरला आहे. भारताकडून यापूर्वी बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिलदेव आणि अनिल कुंबळे यांचा समावेश करण्यात आला आहे. 

द्रविडने या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, ""आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेट विश्‍वात आपल्या कामगिरीचा अमूल्य ठसा उमटविणाऱ्या "लिजेंड'बरोबर आपले नाव घेतले जाणार याचा मला आनंद आहे.'' 

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी या तिघांचेही या सन्मानाबद्दल अभिनंदन केले आहे. क्रिकेट विश्‍वात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाच यात समावेश होतो. द्रविड, पॉंटिंग, क्‍लेरा यांना हा मान मिळाला. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Dravid, Ricky Ponting Inducted Into ICC Hall Of Fame