गंभीरचे दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

कोलकाता - तंत्रशुद्ध सलामीवीर के. एल. राहुल याच्या उजव्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. बदली खेळाडू म्हणून अखेरच्या दोन कसोटींमध्ये डावखुरा अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर याला दोन वर्षांनंतर कसोटी संघात पाचारण करण्यात आले आहे. 

बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीत त्याची तंदुरुस्ती चाचणी झाली. दुलीप स्पर्धेत गंभीरने सलग चार अर्धशतके काढली होती. यात दोन वेळा त्याने नव्वदीच्या घरात धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी ही माहिती दिली. निवड समितीने ही निवड केली. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकुनगुनियामुळे या कसोटीलाही मुकेल. बदली खेळाडू म्हणून ऑफस्पीनर जयंत यादवला संधी मिळाली आहे.

गंभीर म्हणाला की, मी पुन्हा भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळू शकणार आहे. पांढरे कपडे, लाल चेंडू आणि भारताची टोपी हे पुन्हा असणार, बीसीसीआयचे मी आभार मानतो. पुन्हा पुनरागमन करत असल्याने उत्साही आहे. महात्वाकांक्षा घेऊन मी पुन्हा एकदा ईडन गार्डन्सवर उतरणार आहे. 

Web Title: Rahul injured; Gambhir called