राजस्थान रॉयल्सची नवी जर्सी 

वृत्तसंस्था
Thursday, 10 May 2018

राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलमधील शुक्रवारी (ता. 11) चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खास गुलाबी रंगाची जर्सी घालून खेळणार आहे. या सामन्यासाठीच ती तयार करण्यात आली आहे. कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे

जयपूर  - राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलमधील शुक्रवारी (ता. 11) चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खास गुलाबी रंगाची जर्सी घालून खेळणार आहे. या सामन्यासाठीच ती तयार करण्यात आली आहे. कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी राजस्थान ही तिसरी फ्रॅंचाईजी ठरली आहे. यापूर्वी 1 मे रोजी दिल्ली फ्रॅंचाईजीने कॅन्सरमुक्त दिवस म्हणून लव्हेंडर रंगाची जर्सी वापरली होती, तर बंगळूरने "गो ग्रिन' मोहिमेअंतर्गत एक दिवस हिरव्या रंगाची जर्सी वापरली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan Royals unveiled their new jersey