पाकला 465 धावांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

सिडनी - तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 465 धावांचे आव्हान दिले. चौथ्या दिवसाअखेर पाकने 1 बाद 55 धावा केल्या. आक्रमक डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याचे वेगवान अर्धशतक वैशिष्ट्य ठरले. त्याने 23 चेंडूंतच हा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे हे गेल्या 38 वर्षांतील वेगवान अर्धशतक ठरले. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 2 बाद 241 धावसंख्येवर घोषित केला. 32 षटकांत 7.53च्या सरासरीने त्यांनी या धावा फटकावल्या. वॉर्नर (27 चेंडूंत 8 चौकार, तीन षटकारांसह 55), ख्वाजा (नाबाद 79), स्टीव स्मिथ (59) यांनी चमक दाखविली. त्याआधी 8 बाद 271 वरून पाकचा पहिला डाव 315 धावांत संपला. युनूस खान 175 धावांवर नाबाद राहिला. काल तो 136 धावांवर नाबाद होता. त्याचे हे कारकिर्दीतील 34वे शतक ठरले. याबरोबरच त्याने सुनील गावसकर यांच्या उच्चांकाशी बरोबरी केली.
Web Title: ranaji karandak austrolia & pakistan