ऋषभ पंतचे रणजीत वेगवान शतक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

तिरुअनंतपुरम - दिल्लीचा उदयोन्मुख डावखुरा फलंदाज ऋषभ पंत याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्ध दुसऱ्या डावात वेगवान शतक काढले. हे भारतातील प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान शतक ठरले. त्याने ४८ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. आधीचा उच्चांक दोन फलंदाजांनी प्रत्येकी ५६ चेंडूंमध्ये नोंदविला होता.

दिल्लीवर फॉलोऑनची नामुष्की आली होती. झारखंडने ४९३ धावा केल्या. दिल्लीचा पहिला डाव ३३४ धावांत संपला. त्यात पंतने ११७ धावा केल्या होत्या, पण दीडशेपेक्षा जास्त धावांनी मागे पडल्यामुळे दिल्लीला फॉलोऑन घ्यावा लागला. दुसऱ्या डावात दिल्लीने ६ बाद ४८० धावा केल्या. झारखंडला तीन, तर दिल्लीला एकच गुण मिळाला.

दृष्टिक्षेपात

  • पंतचे पहिल्या डावात आठ, दुसऱ्या डावात १३ असे एकूण २१ षटकार
  • प्रथम-श्रेणी सामन्यात दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी
  • न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोचे प्लंकेट शील्ड स्पर्धेच्या २०१४-१५च्या मोसमात २३ षटकार, मुन्रोचे सर्व षटकात एकाच डावातील
  • भारतीय प्रथम-श्रेणीत आधीचा विक्रम युसूफ पठाणचा. २००९-१० च्या दुलिप करंडक अंतिम सामन्यात त्याचे १५ षटकार
  • यंदाच्या मोसमात पंतची आकडेवारी - षटकार - ४४, स्ट्राइक रेट ११३.०१ (किमान शंभर किंवा जास्त चेंडू खेळलेले फलंदाज)
  • पंतच्या आतापर्यंत ७९९ धावा. सात डावांत चार शतके

फलंदाज     शतकासाठी     एकूण     एकूण     संघ     प्रतिस्पर्धी     मोसम
                    चेंडू             धावा    चेंडू

ऋषभ पंत      ४८              १३५     ६७     दिल्ली     झारखंड     २०१६-१७
राजेश बोरा     ५६             १२६     ६२     आसाम     त्रिपुरा     १९८७-८८
चंद्रशेखर       ५६             ११९     ७८     तमिळनाडू     शेष भारत     १९८८-८९
एस. पॉल       ६०            १००*     ६२     तमिळनाडू     गोवा     १९९५-९६

Web Title: ranaji karandak cricket competition