धोनीच्या गैरहजेरीत होणार रांची 26 वे कसोटी केंद्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

रांची - तिसरा कसोटी सामना रांची येथे होणार आहे. हे भारतातील 26वे कसोटी केंद्र असेल. रांची ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कर्मभूमी. त्याच्या कारकिर्दीत झारखंड क्रिकेट संघटनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. धोनी निवृत्त झाल्यावर रांचीला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला. आता रांचीत कसोटी सुरू होत असताना पाहुणा म्हणूनही धोनी उपस्थित राहू शकणार नाही. विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी तो नवी दिल्लीला गेला आहे.

धोनी यासाठी उपस्थित राहू शकणार नाही याची खंत सर्वांनाच आहे.

त्याचे लहानपणापासूनचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी म्हणाले, 'धोनीमुळेच रांची आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले. त्याच्या कारकिर्दीत हे स्थान मिळाले असते, तर अधिक आनंद झाला असता. त्याने येथे असायला हवे होते. पण, तो हजारे करंडक स्पर्धेत खेळत आहे. तेथे त्याने चांगली कामगिरी करावी हीच आमची अपेक्षा आहे. त्याचवेळी रांची स्टेडियम भारतासाठी "लकी' ठरावे हीच अपेक्षा.''

गर्दी होणार
झारखंड क्रिकेट संघटनेचे सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी धोनीची उणीव भासणार असली, तरी येथे दर दिवशी सामन्याला गर्दी होईल अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, 'धोनी हा आमचा हिरो आहे. रांचीतील क्रिकेटचा तो दूत आहे. हजारे करंडक स्पर्धेतील सामन्यामुळे तो येऊ शकणार नाही. त्याने येथे हजारे करंडक सामन्यातील विजेतेपद मिळवूनच यावे, अशी आमची इच्छा आहे. धोनी येथे नसल्यामुळे चाहते जरूर निराश होणार असले, तरी ते सामन्याला नक्की गर्दी करतील.''

मोफत पास
झारखंड क्रिकेट संघटनेने रांचीतील धोनीच्या जवाहर विद्या मंदिर प्रशालेसह विविध शाळा, संस्थांना मोफत विद्यार्थी पास दिले आहेत. त्यामुळे रोज किमान दहा हजार मुले येथे उपस्थिती लावतील. त्याचबरोबर धोनीच्या कुटुंबीयांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. ते पाच दिवसांपैकी एक दिवस निश्‍चित येतील, असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: ranchi 26th cricket test center