चिरागने दाखवला गुजरातला आशेचा किरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

मुंबई - बलाढ्य मुंबईला पराभूत करून रणजी विजेतेपद मिळवणाऱ्या गुजरातने इराणी करंडक सामन्यातही वर्चस्वाचा दीप लावला. चिराग गांधीच्या शानदार शतकाच्या जोरावर पहिल्या दिवसअखेर आठ बाद ३०० अशी मजल मारली. प्रमुख चार फलंदाज ८२ धावांत परतल्यानंतर ही वाटचाल त्यांना निश्‍चितच सुखावणारी ठरली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवरील ही लढत पार्थिव पटेल वि. वृद्धिमन साहा यांच्या लढतीसाठी, तसेच चेतेश्‍वर पुजारा आणि करुण नायर या कसोटीवीरांना लय सापडण्यासाठी महत्त्वाची आहे, पण गुजरातच्या चिरागने नाबाद १३६ धावांची खेळी करून लक्ष वेधले. इराणी करंडक लढतीचा पहिला दिवस संमिश्र होता. 

ब्रेबॉर्नची खेळपट्टी फलंदाजीस पोषक असली तरी सकाळचा गारवा आणि दिवसभरातले ढगाळ वातावरण याचा फायदा शेष भारताचे वेगवान गोलंदाज पंकज सिंग आणि सिद्धार्थ कौलने घेतला. प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या पार्थिव पटेलच्या संघाची अवस्था पहिल्या सत्रात चार बाद ८८ अशी झाली होती. पहिल्याच षटकात गोयलला बाद केल्यानंतर पंकजने पांचाळलाही माघारी धाडले. सिद्धार्थ कौलने ध्रुव रावळ आणि पार्थिवला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, तेव्हा प्रथम फलंदाजीचा निर्णय मुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली होती, पण चिरागने एक बाजू केवळ खंबीरपणे लढवली. त्याने प्रसंगी आक्रमकताही दाखवली. १२५ चेंडूंत १२ चौकारांसह केलेले शतक याची ग्वाही देत होते. प्रथम त्याने मनप्रित जुनेजासह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. जुनेजाला मुंबईकर हेरवाडकरने बाद केले, तेव्हा गुजरातच्या दोनशे धावाही नव्हत्या. त्यानंतरही त्यांनी दिवसअखेर त्रिशतकी मजल मारली ती चिरागच्या सकारात्मक फलंदाजीमुळे! 

Web Title: ranji trophy mumbai vs gujrat