शास्त्री, सेहवागसह सहा जणांची प्रशिक्षकपदासाठी मुलाखत

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मुडी, अफगाणिस्तानचे सध्या मार्गदर्शक असलेले लालचंद राजपूत, रिचर्ड पीबस, क्रेग मॅकडरमॉट, फिल सिमन्स, लान्स क्लुजनर, डोडा गणेश, राकेश शर्मा, उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांचे अर्ज आले होते.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह आणखी सहा जणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. उद्या (सोमवार) प्रशिक्षकपदासाठी मुलाखती होणार आहेत.

प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांचे नाव आघाडीवर असून, तीन सदस्यीय समिती प्रशिक्षक निवडणार आहे. प्रशिक्षकपदासाठी 10 जुलैला मुलाखती होणार आहेत. क्रिकेट सल्लागार समितीत सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. 9 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) यापूर्वी सांगण्यात आले होते. आज अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर बीसीसीआयने दहा जणांचे अर्ज आल्याची माहिती दिली आहे. 

रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मुडी, अफगाणिस्तानचे सध्या मार्गदर्शक असलेले लालचंद राजपूत, रिचर्ड पीबस, क्रेग मॅकडरमॉट, फिल सिमन्स, लान्स क्लुजनर, डोडा गणेश, राकेश शर्मा, उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांचे अर्ज आले होते. यातील सहा जणांची मुलाखत होणार आहे. भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी अनिल कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले होते. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी मुलाखती होत आहेत. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीतील वादामुळे या पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:
शेतकऱ्याने मुलींना नांगराला जुंपून नांगरले शेत
कर्करोगग्रस्त पाकिस्तानी महिलेची सुषमांकडे मदतीची याचना
संपूर्ण कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलनाचा 'एल्गार' !
दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचा जवान जखमी
भंडारदरा धरणात मुंबईतील तरुण बेपत्ता​
धुळे: टँकरद्वारे पिकांना पाणी; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल​
दिव्यांगाच्या जीवनात शिक्षणाची बहार!​
कॉंग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री बरे होते : आदित्य ठाकरे​
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला धक्का​
'इंदू सरकार'वर कॉंग्रेसचा आक्षेप​
'लोक'शाही की 'एक'शाही? (संजय मिस्कीन)​
इस्राईलशी मैत्रीपर्व (श्रीराम पवार)​
#स्पर्धापरीक्षा - हरित भारत अभियान​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Shastri, Virender Sehwag to be interviewed for post of India coach