अाश्विन बनला Cricketer Of The Year

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली - भारताचा फिरकी गोलंदाज आर. अाश्विन याची आज (गुरुवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. तसेच त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही निवड करण्यात आली. तर, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

आयसीसीच्या वतीने आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणता खेळाडू पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये अाश्विनने बाजी मारली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 या वर्षभरात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.अाश्विनने नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. आयसीसीच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला देण्यात आले असून संघात आर. अश्विन या केवळ एकाच भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे आयसीसीच्या एकदिवसीय संघात विराट कोहली याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे, तर संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा याला स्थान मिळाले आहे. 

पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक याला 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' हा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटला टी-20 परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमानला उभारता खेळाडू म्हणून निवडण्यात आले. सर्वोत्कृष्ट पंच म्हणून मरेइस इरॅस्मस यांची निवड झाली आहे. आयसीसीच्या सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद ठरला आहे.

महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आणि टी-20 खेळाडू म्हणून न्यूझीलंडची सुझी बेट्सची निवड झाली आहे.

Web Title: Ravichandran Ashwin is the ICC Cricketer of the Year