जडेजा 'नंबर वन' गोलंदाज; पुजारानेही घेतली क्रमवारीत झेप 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा रवींद्र जडेजा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाला आहे. त्याने भारताच्याच आर. आश्‍विनला मागे टाकले. रांची कसोटीमध्ये द्विशतक झळकाविणारा चेतेश्‍वर पुजाराही फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रांची येथे झालेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. या कसोटीत जडेजाने नऊ गडी बाद केले होते. खेळपट्टी फिरकीला साथ देत नसली, तरीही जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सतावले आहे. किंबहुना, या कसोटीपूर्वी प्रथम क्रमांकावर असलेल्या आश्‍विनपेक्षाही जडेजा आता भेदक वाटू लागला आहे. गेल्या 24 डावांमध्ये जडेजाने 67 गडी बाद केले आहेत. 

कसोटीतील फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अद्यापही प्रथम क्रमांकावर कायम आहे. रांचीतील द्विशतकानंतर पुजाराने भारताचा कर्णधार विराट कोहलीला क्रमवारीत मागे टाकले. कसोटी क्रिकेटमधील उपलब्ध नोंदींनुसार, रांचीतील द्विशतकादरम्यान पुजाराने एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान पटकाविला. हे पुजाराच्या कारकिर्दीतील तिसरे द्विशतक होते. 

कसोटीतील गोलंदाजांची क्रमवारी 
1. रवींद्र जडेजा (899 गुण) 
2. आर. आश्‍विन (862 गुण) 
3. रंगना हेराथ (854 गुण) 
4. जोश हेझलवूड (842 गुण) 
5. जेम्स अँडरसन (810 गुण) 

कसोटीतील फलंदाजांची क्रमवारी 
1. स्टीव्ह स्मिथ (942 गुण) 
2. चेतेश्‍वर पुजारा (861 गुण) 
3. ज्यो रूट (848 गुण) 
4. विराट कोहली (826 गुण) 
5. केन विल्यम्सन (823 गुण) 

कसोटीतील सांघिक क्रमवारी 
1. भारत (121 गुण) 
2. ऑस्ट्रेलिया (109 गुण 
3. दक्षिण आफ्रिका (107 गुण) 
4. इंग्लंड (101 गुण) 
5. न्यूझीलंड (98 गुण) 

Web Title: Ravindra Jadeja tops ranking in ICC Test bowlers