जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जून 2017

संक्षिप्त धावफलक -
न्यूझीलंड 50 षटकांत 8 बाद 265 (रॉस टेलर 63, केन विल्यम्सन 57, नील ब्रूम 36, मार्टिन गुप्टिल 33, मोसाडेक हुसेन 3-13, टस्किन अहमद 2-43) पराभूत वि बांगलादेश 47.2षटकांत 5 बाद 268 (शकिब अल हसन 114, महमुदुल्ला नाबाद 102)

कार्डिफ - मधल्या फळीत शकिब अल हसन आणि महमुदुल्ला यांनी झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर शुक्रवारी बांगलादेशाने चॅंपियन्स करंडक स्पर्धेत न्यूझीलंडवर 5 गडी राखून विजय मिळविला. आता उद्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यावर त्यांचे उपांत्य फेरी प्रवेशाचे भवितव्य अवलंबून असेल. ऑस्ट्रेलिया हरल्यास बांगलादेश उपांत्य फेरीत जाईल.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 265 धावा केल्या. केन विल्यम्सन, रॉस टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. मोसाडेक हुसेन याने तीन गडी बाद केले.

विजयासाठी 265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉस टेलरच्या भेदक माऱ्याने चार षटकांतच बांगलादेशची अवस्था 3 बाद 12 आणि नंतर 11 व्या षटकांत 4 बाद 33 अशी बिकट झाली होती. पण, त्यानंतर अनुभवी शकिब अल हसन आणि महमुदुल्ला यांनी जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत बांगलादेशाचा विजय साकार केला. दोघांनी तडाखेबंद नाबाद शतकी खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 224 धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोघांच्या फलंदाजीपुढे सुरवातीला धारदार वाटणारी न्यूझीलंडची गोलंदाजी बोथट ठरली. बांगलादेशाने 47.2 षटकांत 5 बाद 268 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक -
न्यूझीलंड 50 षटकांत 8 बाद 265 (रॉस टेलर 63, केन विल्यम्सन 57, नील ब्रूम 36, मार्टिन गुप्टिल 33, मोसाडेक हुसेन 3-13, टस्किन अहमद 2-43) पराभूत वि बांगलादेश 47.2षटकांत 5 बाद 268 (शकिब अल हसन 114, महमुदुल्ला नाबाद 102)

Web Title: Record-breaking Shakib and Mahmudullah stun New Zealand