आयपीएलचा एकूण मोसम ठरला अगदी रोमहर्षक 

वृत्तसंस्था
Monday, 28 May 2018

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने ठसा उमटविला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने संघाला सर्वाधिक गरज असताना पुढाकार घेतला. श्रेयस अय्यर याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या आव्हानामध्ये पुन्हा आशा निर्माण केली. प्रत्येक खेळाडूकडे एक महत्त्वाची भूमिका असते आणि या स्पर्धेत काही खेळाडूंची कामगिरी उठून दिसली. सनरायझर्स हैदराबादचा रशीद खान, किंग्ज इलेव्हन पंजाबचा के. एल. राहुल आणि चेन्नई सुपर किंग्जच्या अंबाती रायुडू यांनी सनसनाटी कामगिरी केली. कोलकात्याचे सुनील नारायण, आंद्रे रसेल तसेच चेन्नईचा सुरेश रैना यांनी प्रत्येक मोसमाप्रमाणेच या वेळी सर्वोत्तम खेळ केला. 
 
यंदाची स्पर्धा तरुण खेळाडूंनी प्रभाव पाडत गाजविली. राजस्थान रॉयल्स संघासाठी के. गौतम आणि श्रेयस गोपाल यांनी चमकदार खेळ केला. सिद्धार्थ कौलने "मेंटॉर' शेन वॉर्न याच्या शब्दांपासून प्रेरणा घेतली. अंतिम टप्प्यातील "स्पेल'चे अचूक कौशल्य त्याने आत्मसात केले. दिल्लीचा रिषभ पंत नवा "पॉवरहिटर' म्हणून उदयास आला. धुर्त फलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला तारले. 

दुसरीकडे काही खेळाडूंनी घोर निराशा केली. घसघशीत रकमेच्या करारावर आलेल्या काही जणांचा खेळ अपेक्षेपेक्षा खालच्या दर्जाचा झाला. फ्रॅंचायजीला तसेच कराराला ते न्याय देऊ शकले नाहीत. 

आयपीएलच्या अकराव्या अध्यायात बरेच चढउतार आले. पहिल्या सामन्यापासून चुरशीच्या लढती झाल्या. संघांनी अनपेक्षित पुनरागमन करीत अखेरच्या चेंडूवर विजय मिळवित चाहत्यांना खिळवून ठेवले. एकीकडे जल्लोष, तर दुसरीकडे निराशा असे चित्र दिसले, पण एकूण मोसम नक्कीच रोमहर्षक ठरला. शेवटी असे म्हणतात की, तुम्ही जिंकता की हरता याला नव्हे तर खेळ कशा प्रकारे खेळता याला महत्त्व असते. या स्पर्धेलाही हेच लागू होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: richards writes about IPL matches