इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंत भारतीय संघात

वृत्तसंस्था
Wednesday, 18 July 2018

लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे. 

लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा आज (बुधवार) झाली. साहाला दुखापत झाल्यामुळे पंतला राखीव यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. अर्थात, त्याला प्रत्यक्ष सामन्यात संधी मिळण्याची फारशी शक्‍यता नाही. साहाच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकला कसोटीमधील यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळेल. कामगिरी खालावलेल्या महंमद शमीचे कसोटी संघातील स्थान कायम राहिले आहे. 

इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी भारताने ईशांत शर्मा, शमी, उमेश यादव, जसप्रित बुमराह आणि ठाकूर अशी वेगवान गोलंदाजांची फळीच निर्माण केली आहे. भारताचा हुकमी एक्का असलेला भुवनेश्‍वर कुमारला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली आहे; मात्र तंदुरुती सिद्ध केल्यानंतर त्याला संघात स्थान मिळेल, असे 'बीसीसीआय'ने म्हटले आहे. 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर. आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishabh Pant gets chance in Indian team for test series against England