esakal | रिषभ पंतची अनपेक्षित निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant's unexpected selection in test cricket

रिषभ पंतची अनपेक्षित निवड 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- झटपट क्रिकेटमध्ये आपली छाप पाडणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात अनपेक्षित स्थान मिळाले आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त भुवनेश्‍वरचा विचार करण्यात आला असून, दुखापतीतून बरा होणाऱ्या जसप्रीत बुमराचा दुसऱ्या कसोटीपासून संघात समावेश करण्यात आला आहे. 

एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर "बीसीसीआय'ने बुधवारी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. 

"बीसीसीआय'चे हंगामी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, ""एकदिवसीय सामन्यात भुवनेश्‍वरला पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. त्याला वगळण्यात आलेले नाही, फार तर विश्रांती म्हणता येईल. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर नजर ठेवून आहे. त्यांच्या अहवालानंतर त्याच्या कसोटी सामन्याच्या मालिकेतील समावेशाविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल.'' 

बुमरा कायम 
या 18 सदस्यीय संघात जखमी बुमराचे नाव कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, असे करताना बुमरा केवळ दुसऱ्या कसोटी सामन्यापासून निवडीसाठी उपलब्ध असेल, असे "बीसीसीआय'ने स्पष्ट केले आहे. एकदिवसीय मालिकेसाठी पाचारण करण्यात आलेल्या शार्दूल ठाकूरलादेखील थांबण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीसाठी आता ईशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर असे पर्याय भारतासमोर उपलब्ध असतील. फिरकी गोलंदाजीत अश्‍विन आणि जडेजाच्या साथीला कुलदीपला संघात स्थान मिळाले आहे. 

कसोटी मालिकेसाठी आता भारतातून मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा आणि करुण नायर हे तीनच फलंदाज इंग्लंडला रवना होतील. निवड समितीने आजच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध होणाऱ्या तीन दिवसांच्या सराव सामन्यासाठी अध्यक्षीय इलेव्हन संघाचीदेखील घोषणा केली. या मालिकेसाठी इशान किशन कर्णधार असेल. हा सामना बंगळूरला 30 जुलैपासून सुरू होईल. 

कसोटी संघ ः 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, रिषभ पंत (दोघे यष्टिरक्षक), आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर. 

अध्यक्षीय इलेव्हन
इशान किशन (कर्णधार), आर. आर. संजय, ए. आर. ईश्‍वरन, ध्रुव शोरे, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, जलज सेक्‍सना, सिद्धेश लाड, मिहीर हिरवाणी, डी. ए. जडेजा, आवेश खान, शिवम मावी, इशान पोरेल, अतिथ शेठ. 

loading image