रोहितसह कुलदीपही कसोटीसाठी दावेदार

वृत्तसंस्था
Saturday, 14 July 2018

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नॉटिंगहॅमला भारताने केलेली सफाईदार कामगिरी पाहता इंग्लंडचा संघव्यवस्थापन विचारात पडले असेल. पुढील दोन सामन्यांच्या तयारीसाठी त्यांना बराच विचार करावा लागेल. या खेळपट्टीवर गेल्या पाच वर्षांतील सरासरी धावसंख्या तीनशेपेक्षा जास्त होती. असे असूनही त्यांचा 268 धावांत डाव संपला. भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमरा असे सर्वाधिक अनुभवी गोलंदाज नसूनही हे घडले. साहजिकच आव्हानात्मक धावसंख्या कशी उभारायची, याचा इंग्लंडला फार विचार करावा लागेल.

अर्थात, मातब्बर भारतीय फलंदाजीसमोर आव्हानात्मक धावसंख्या असेल तरी किती असा प्रश्‍न निर्माण होतो. भारताने नऊपेक्षा जास्त षटके शिलकीत ठेवून विजय मिळविला. भारताला एकदाही फारसे प्रयास पडले नाहीत. रोहित शर्माची फलंदाजी वेगवान सुपरकारसारखी असते. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी त्याला वगळण्यात आले. त्यानंतर मात्र तो अशा फलंदाजीद्वारे आपली भक्कम दावेदारी निर्माण करीत आहे. हवामानासह खेळपट्ट्यांशीसुद्धा जुळवून घ्यावे लागते. जो फलंदाज दोन वेगळ्या प्रकारच्या सामन्यांत शतके काढतो तो यात यशस्वी ठरल्याचे आणि पर्यायाने दीर्घ प्रकारच्या क्रिकेटसाठीही सज्ज असल्याचे दिसून येते. कसोटीत जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी वेगळी असेल, पण कसोटीत रोहित खालच्या क्रमांकावर खेळेल. त्याला नव्या लाल चेंडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार नाही.

आपली भक्कम दावेदारी निर्माण केलेला आणखी एक खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. भारतीय फलंदाजीपेक्षाही या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला कसे सामोरे जायचे, या विचाराने इंग्लंडवर ताण येईल. जॉस बट्‌लरचा अपवाद सोडल्यास इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला त्याच्या चेंडूच्या फिरकीचा अंदाज येत नाही. कुलदीप "रॉंग वन' टाकतो तेव्हा चेंडू त्याचा हात मागे असतो आणि तो मैदानाला जवळपास समांतर खाली येतो. साहजिकच अशा चेंडूचा वेध घेणे आणखी कठीण बनते. हेच जर हात उभा खाली आला तर हे काम थोडे सोपे बनते.

एकदिवसीय सामन्यात सहा विकेट म्हणजे दीडशेपेक्षा जास्त धावा किंवा रोहितच्या दोन शतकांसारखी कामगिरी आहे. कुलदीपने दोन वेळा "पाच विकेट'ची कामगिरी केली आहे. त्यामुळे कसोटीतही त्याला संधी देण्याचा विचार निवड समितीला करावा लागेल.
हवामान उष्ण असण्याची शक्‍यता आहे. परिणामी, खेळपट्ट्या जास्त कोरड्या असतील. ओलसर हवामानाच्या तुलनेत फिरकीला जास्त साथ मिळेल. भारतीय निवड समितीसाठी संघनिवडीतील पर्याय स्वागतार्ह असतील; पण इंग्लंडसाठी हीच डोकेदुखी आहे. त्यावर उपाय शोधला नाही तर टी-20 प्रमाणेच या मालिकेतही त्यांची हार झालेली असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit and kuldeep may get chance to play in Test series