World Cup 2019: धवन पाठोपाठ रोहित शर्माचेही अर्धशतक

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

वर्ल्ड कप 2019:
ओव्हल: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी खेळताना वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार सुरवात केली असून सलामीवीर शिखर धवन पाठोपाठ रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावले आहे. 61 चेंडूचा सामना करताना रोहित शर्माने अर्धशतकाचा टप्पा पूर्ण केला आहे.
 
शिखर धवनचे अर्धशतक, भारताची दमदार सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेलल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात रोहित शर्माने 61 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने 3 चौकार आणि एक षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. कोणताही मोठा फटका मारण्याच्या नादात न पडता संयमी खेळी करत त्याने हे अर्धशतक साकारले. 

दरम्यान, रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. हिटमॅन रोहित शर्माचा दुसऱ्या षटकात नॅथन कोल्टर नायलने झेल सोडला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याने हा कॅच सोडल्यानंतर रोहित आणि शिखरची जोडी चांगलीच जमली असून त्यांनी शतकी भागीदारीही केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma brings up his 50 off 61 deliveries