यो यो चाचणीत रोहित शर्मा तंदुरुस्त

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

महंमद शमी आणि अंबाती रायुडू यो यो चाचणीत नापास झाल्यामुळे आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यास मुकणार आहेत, परंतु बदली कर्णधार रोहित शर्मा तंदुरुस्त झाला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार आहे. 
 

बंगळूर - महंमद शमी आणि अंबाती रायुडू यो यो चाचणीत नापास झाल्यामुळे आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यास मुकणार आहेत, परंतु बदली कर्णधार रोहित शर्मा तंदुरुस्त झाला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार आहे. 

आयपीएमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा गेले काही दिवस रशियामध्ये होता. त्याच्या तंदुरुस्तीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. बंगळूरमधील राष्ट्रीय अकादमीत रोहितची आज यो यो चाचणी घेण्यात आली. यात तो तंदुरुस्त ठरला. 

भारतीय संघ काही दिवसांत आयर्लंडसाठी रवाना होत असून, तेथे 27 आणि 29 जूनला दोन ट्‌वेन्टी-20 सामने खेळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma fit in yo yo test