World Cup 2019 : रोहितने ठोकला सचिनसारखा षटकार

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माने अगदी मुंबईकर सचिन तेंडुलकरप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीला थर्ड मॅनवरून षटकार खेचला. रोहितच्या या फटक्याने चाहत्यांना सचिनच्या त्या षटकाराची आठवण झाली.

मँचेस्टर : भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माने अगदी मुंबईकर सचिन तेंडुलकरप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीला थर्ड मॅनवरून षटकार खेचला. रोहितच्या या फटक्याने चाहत्यांना सचिनच्या त्या षटकाराची आठवण झाली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडकातील लढतींमध्ये आतापर्यंत भारताचेच वर्चस्व राहिले आहे. आज (रविवार) ओल्ड ट्र्रॅफर्डवर होत असलेल्या सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी शतकी भागीदारी करून चांगली सुरवात केली. धवन जखमी असल्याने के. एल. राहुल सलामीला आला होता. रोहित शर्माने गेल्या काही सामन्यांतील आपला फॉर्म या सामन्यातही कायम ठेवला. मोहम्मद आमीर, वहाब रियाझ, हसन अली या जलदगती गोलंदाजांची त्याने धुलाई करत धावफलक हालता ठेवला.

रोहितने 27 व्या षटकात हसन अलीला थर्ड मॅन वरून षटकार खेचला. 2003 च्या विश्वकरंडकात सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला असाच षटकार खेचला होता. क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात अद्याप तो फटका असताना आता रोहितचा हा फटका स्मरणात राहण्यासारखा आहे. हे दोन्ही खेळाडू मुंबईचेच असल्याचाही योगायोग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma hits a six just like Sachin Tendulkar