हिटमॅन रोहित शर्मा झाला बाप; चौथ्या कसोटीतून माघार

वृत्तसंस्था
Monday, 31 December 2018

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या आनंदी बातमीमुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या आनंदी बातमीमुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रोहितने मी बाप होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

क्रीडाविषयक आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा...

दरम्यान, सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, आपल्या लाडक्या लेकीला पाहण्यासाठी तो लवकरच भारतात परतणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी रोहित मुकणार असला तरी तो एकदिवसीय मालिकेसाठी पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या घरातून आलेल्या या गोड बातमीमुळे रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma Ritika Become Proud Parents After Birth Of Baby Girl