धोनी म्हणजेच 'डीआरएस' पुन्हा एकदा सिद्ध

वृत्तसंस्था
Monday, 12 February 2018

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दिलेले आव्हान ते पार करू शकले. त्यामुळे भारताला आता दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्यासाठी पाचव्या सामन्याची वाट पहावी लागणार आहे. धोनीने यापूर्वीही अनेकवेळा डीआरएसचे निर्णय घेण्याबाबत कोहलीची मदत केली आहे.

जोहान्सबर्ग - महेंद्रसिंह धोनी याची एकदिवसीय क्रिकेटमध्ये 'डीआरएस' (धोनी रिव्ह्यू सिस्टीम) अशी असलेली ओळख पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याच्या बॅटला चेंडू लागून धोनीकडे गेल्याचे अपील भारतीय खेळाडूंनी केले. रोहित शर्माने कर्णधार कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितले. पण, कोहलीने पुन्हा एकदा धोनीकडे धाव घेत याबाबत विचारणा केली. त्यावर धोनीने डीआरएस घेण्यास नकार दिला. अखेर रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर स्पष्ट झाले, की चेंडूला बॅटला लागलाच नव्हता. त्यामुळे डीआरएस म्हणजेच धोनी रिव्ह्यू सिस्टीम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दिलेले आव्हान ते पार करू शकले. त्यामुळे भारताला आता दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्यासाठी पाचव्या सामन्याची वाट पहावी लागणार आहे. धोनीने यापूर्वीही अनेकवेळा डीआरएसचे निर्णय घेण्याबाबत कोहलीची मदत केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma Signals Virat Kohli To Take DRS MS Dhoni Overrules And Gets It Right Again