World Cup 2019 : भारताला एक तरी ट्रॉफी मिळणार?

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

वर्ल्डकप मधील भारताचे आव्हान हे उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे. भारताचे वर्ल्डकप जिंकून आणण्याचे स्वप्न न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धुळीला मिळाले. भारताला आता कुठली ट्रॉफी मिळण्याची शक्यता नसली तरी एक ट्रॉफी मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे सर्वाधिक धावा काढण्याच्या शर्यतीत उपकर्णधार रोहित शर्मा आघाडीवर आहे.

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : वर्ल्डकप मधील भारताचे आव्हान हे उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे. भारताचे वर्ल्डकप जिंकून आणण्याचे स्वप्न न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धुळीला मिळाले. भारताला आता कुठली ट्रॉफी मिळण्याची शक्यता नसली तरी एक ट्रॉफी मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे सर्वाधिक धावा काढण्याच्या शर्यतीत उपकर्णधार रोहित शर्मा आघाडीवर आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यापेक्षा तो पुढे आहे. रोहित शर्माने एकूण 09 सामन्यात 05 शतकांच्या मदतीने 648 धावा काढल्या आहेत. या सर्व धावा त्याने 81च्या सरासरीने काढल्या आहेत. तसेच, डेव्हिड वॉर्नर अंतिम सामना खेळण्याची शक्यता कमी आहे कारण, इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड एकतर्फी पराभव करण्याची शक्यता सध्या दिसत आहे.

रोहित शर्मा हा पहिल्या क्रमांकावर असून रोहित शर्माच्या जवळपास सध्यातरी इंग्लंड आणि न्यूझीलंड या अंतिम सामना खेळणाऱ्या संघातील खेळाडू दिसत नाही. त्यामुळे भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या रुपाने भारताला एकतरी ट्रॉफी मिळण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma still ahead of David Warner in list of most runs in World Cup 2019