esakal | World Cup 2019 : धोनीचा 'हा' रेकॉर्ड मोडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2019 : धोनीचा 'हा' रेकॉर्ड मोडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा षटकारांचा विक्रम मोडीत काडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आला आहे.

World Cup 2019 : धोनीचा 'हा' रेकॉर्ड मोडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 :
मॅंचेस्टर :
विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असताना पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याला सुरवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना धिम्या गतीने सुरवात केली. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा षटकारांचा विक्रम मोडीत काडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आला आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने हसन अलीच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार हा रोहितला षटकारांचा बादशहा बनवून गेला. भारताच्या खेळाच्या सहाव्या षटकात त्याने चेंडून सीमारेषेच्या बाहेर टोलावला आणि याच षटकाराने त्याने धोनीचा विक्रम मोडीत काढला. या षटकारासह तो भारताकडून एकदिवसीय सामन्यात सार्वाधिक षटकार ठोकणार खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने एकदिवसीय सामन्यात एकूण 355 षटकार ठोकले आहेत. तर रोहित शर्माचे आता 356 षटकार झाले आहेत.

एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
356* रोहित शर्मा
355 महेंद्र सिंह धोनी
264 सचिन तेंडुलकर
251 युवराज सिंग
247 सौरभ गांगुली 
243 विरेंद्र सेहवाग

loading image