साबा करीम यांचा इंग्लंड दौरा अडचणीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

प्रशासक समिती "बीसीसीआय' पदाधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्याला आक्षेप घेत असताना निवड समिती अध्यक्ष कसे परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात, असा प्रश्‍न खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी उपस्थित केला आहे. 

नवी दिल्ली- प्रशासक समिती "बीसीसीआय' पदाधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्याला आक्षेप घेत असताना निवड समिती अध्यक्ष कसे परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात, असा प्रश्‍न खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी उपस्थित केला आहे. 

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना साबा करीमदेखील इंग्लंडला गेले असून, नऊ दिवसांसाठी त्यांनी दर दिवशी 30 हजार रुपये खर्च दाखवला असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. प्रशासक समिती पदाधिकाऱ्यांना अडवत असताना साबा करीम यांना टी-20 साठी इंग्लंड दौऱ्याला कशी परवानगी देतात, अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

प्रशासक समितीला पत्र पाठवताना चौधरी यांनी चार प्रश्‍न विचारले आहेत. यात सर्वप्रथम त्यांनी साबा करीम यांच्या इंग्लंड दौऱ्याचा नेमका उद्देश काय, त्यांना या दौऱ्याला मान्यता कशी मिळाली, त्यांच्याखेरीज अन्य कुणी पदाधिकारी दौऱ्यावर गेला होता का आणि गेला असेल, तर मग साबा करीम यांनी जाणे गरजेचे होते का ? अशा प्रश्‍नांची सरबत्ती त्यांनी केली आहे. 

Web Title: Saba Karim’s trip to UK creates further BCCI, CoA differences