सचिन तेंडुलकर-पिअर्स मॉर्गनकडून ट्विटरवर इंग्लंडची खिल्ली

पीटीआय
शनिवार, 21 जानेवारी 2017

नवी दिल्ली - भारत दौऱ्यातील वन-डे मालिका एक सामना बाकी असतानाच गमावलेल्या इंग्लंड संघाच्या कामगिरीची ट्विटरवर खिल्ली उडाली. सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचे नामवंत पत्रकार पिअर्स मॉर्गन यांच्यातील ट्विटमुळे हे घडले.

दुसऱ्या सामन्यात युवराज, धोनी हे वरिष्ठ खेळाडू चमकले. त्यांचे फोटो पोस्ट करून सचिनने ट्विट केले की, ‘एक सुपरस्टार आणि दुसरा रॉकस्टार यांनी किती अनोखी भागीदारी रचली! आम्ही या कामगिरीचा आनंद लुटला.’ त्यावर मॉर्गन यांनी ट्विटवर सचिनला प्रश्न केला, की ‘तेवढेच वय असलेला आणि इंग्लंडने संघात परत घ्यावा असा कुणी सुपरस्टार-रॉकस्टार तुला माहीत आहे का?’ मॉर्गन हे पीटरसनचे चांगले मित्र आहेत. पीटरसनला इंग्लंडने संघात स्थान दिले नसताना त्यांनी या निर्णयाच्या विरोधात अनेक ट्विट केल्या आहेत. या ट्विटमध्ये सुद्धा त्यांनी पीटरसनचे नाव न घेता उपरोधिक प्रश्न केला होता. त्यावर सचिनने इतकेच ट्विट केले, की ‘एकच नाव मनात येते आणि तुम्ही त्याविषयी अचूक अंदाज बांधला असेल ना?’

Web Title: Sachin Tendulkar-Piers Morgan